महसूल मंत्री व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा भव्य दिव्यनागरी सन्मान सोहळा.. महसूलमंजी चंद्रशेखर बावनकुळे बयांच्याकडून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे कौतुक…

महसूल मंत्री व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा भव्य दिव्यनागरी सन्मान सोहळा..

महसूलमंजी चंद्रशेखर बावनकुळे बयांच्याकडून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे कौतुक…

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

श्री तुळजाभवानी मंदिर व तुळजापूर शहरसर्वांगीण विकासासाठी महायुती सरकारने दिलेल्या १८६५ कोटी असा भरघोस निधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महसूल मंत्री मा.चंद्रशेखर बावनकुळे व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा भव्यदिव्य नागरी सत्कार सोहळा तुळजापूर शहर वाशी यांच्यावतीने वेताळ नगर परिसरात श्री भवानी तिर्थकुंड येथे शहरातील सर्व नागरिकांच्या घरी सन्मानाने टॉवेल टोपीचा आहेर घरपोच करून सन्मानाने शहरातील हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य सत्कार सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, राजाभाऊ राऊत, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, नितीन काळे, अर्चनाताई पाटील, युवा नेते विनोद गंगणे, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, बाळासाहेब शिंदे, माजी सभापती विजय गंगणे, उपस्थित होते.
तसेच तालुकाध्यक्ष आनंद कंदले, सुनील चव्हाण, संतोष बोबडे, दिनेश बागल, राजेश्वर कदम, निलेश रोचकरी, धैर्यशील दरेकर, समर्थ पैलवान, रोहित चव्हाण यांच्यासह भाजपचे पदाधिकारी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

“राणा पाटील लवकरच मंत्री होतील” मंत्री बावनकुळे यांची घोषणा

कार्यक्रमात बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या कार्याची प्रशंसा करत म्हनाले,राणाजगजितसिंह पाटील हे तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रीय आमदार आहेत. त्यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करीन, आणि यासाठी मी शब्द देतो.”या भावनिक घोषणेनंतर सभास्थळी टाळ्यांचा कडकडाट आणि घोषणांचा जल्लोष

धर्मगुरूंच्या उपस्थितीने आध्यात्मिकतेचा साज

श्री तुळजाभवानी मंदिराचे मुख्य महंत तुकोजी बुवा ,गुरु बजाजी बुवा, तसेच इच्छागिरी महाराज, मावजीनाथ बाबा,वाकीजी बुवा, चिलोजी बुवा,हमरोजी बुवा या धर्मगुरूंच्या उपस्थितीने कार्यक्रमाला आध्यात्मिक अधिष्ठान लाभले. कार्यक्रमाची सुरुवात मंत्रोउच्चार, पूजन आणि आशीर्वादाने झाली

पोलीस प्रशासनाची शिस्तबद्ध व्यवस्था

तुळजापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने उत्कृष्ट बंदोबस्त, वाहतूक व्यवस्थापन आणि गर्दी नियंत्रण सांभाळले. कार्यक्रम शांततेत, शिस्तबद्ध आणि वेळेत पार पडला,याचे श्रेय संपूर्ण पोलिस दलाला देण्यात येत आहे.

स्वागताध्यक्ष व आयोजक मंडळ
या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष होते
बाळासाहेब शिंदे माजी नगराध्यक्ष,बाळासाहेब शामराज ज्येष्ठ भाजपा नेते,मुख्य निमंत्रक व आयोजक विनोद (पिटु) गंगणे मा.नगरसेवक,सचिन रोचकरी – माजी नगराध्यक्ष,आनंद कंदले – तालुकाध्यक्ष भाजप,शांताराम पेंदे तुळजापूर शहराध्यक्ष,भाजप,तसेच समस्त तुळजापूर शहरवासी व भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी,प्रिती भोजनाची उत्तम व्यवस्था कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी प्रीतिभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. शिस्तबद्ध आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात भोजनाचा लाभ नागरिकांनी घेतला. महिला, युवक, वयोवृद्ध शहराती नागरीक आनंदात सहभागी होते.

तुळजापूरच्या विकासाची दिशा निश्चित करणारा सोहळा

हा नागरी सत्कार केवळ सन्मानापुरता मर्यादित न राहता तुळजापूरच्या उज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी क्षण ठरनार.कार्यक्रमात उमटलेली जनतेची भावना आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर असलेला विश्वास राजकारणातील सकारात्मकतेचे प्रभावी ठरला. हा ऐतिहासिक सोहळा तुळजापूरच्या विकासाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे.

पहिल्या दहा आमदारात राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव – मंत्री बावनकुळे

आमदार राणाजगजीतसिंह पाटील हे उत्कृष्ट कार्य करणारे आमदार असून, महाराष्ट्रातील पहिल्या दहा आमदारांमध्ये त्यांचा क्रमांक लागतो. अशा कर्तुत्वान नेत्याचा सत्कार करण्याचे भाग्य मला लाभले असल्याचे बावनकुळे म्हणाले.
तुळजापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच १८६५ कोटी असा भरघोस निधी आणणारे राणा दादा – मा. नगसेवक विनोद उर्फ पिटू गंगण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!