श्रीकृष्ण जन्माष्टमी मोहत्सव
दिपक संघ,झुंजार हनुमान भजनी मंडळ,अखंड हरिनाम सप्ताह आयोजनास ७७ वर्षांची परंपरा
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
श्रीकृष्ण जन्माष्टमी मोहत्सव
दिपक संघ,झुंजार हनुमान भजनी मंडळ तुळजापूर अखंड हरिनाम सप्ताह दि.१० ऑगस्ट दि.१६ ऑगस्ट होत आहे. विशेष म्हणजे या सप्ताहास ७७ वर्षांची अखंड परंपरा आहे.
या निमित्त मंदिर परिसराची रंगरंगोटी करण्यात आली असून, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या सप्ताहात दररोज सकाळी ४ ते ६ काकडा भजन, ७ ते ९ ज्ञानेश्वरी पारायण, ११ ते १ गाथा भजन, दुपारी १ ते ४ श्रीमद् भागवत कथा, सायंकाळी ६ वाजता हरिपाठ, तसेच रात्री ९ वाजता कीर्तन सोहळा होईल. त्यानंतर ११ ते ४ हरिजागर होईल.
श्रीकृष्ण मुर्ती पुजन तुळजापूर ,मुख्याधकारी न.प. तुळजापूर अजिक्य रणदिवे,
ज्ञानेश्वरी ग्रथपुजन प्रतिक रोचकरी, ओकार काळे,तुकाराम गाथा पुजन संग्राम दिलीप नाईकवाडी,निरंजन विजय इंगळे,विनाव ध्वज पूजन संकेत किरण पाटील यांच्या हस्ते झाले.
पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आपणासाहेब मांजरे, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, नितिन (आबा) रोचकरी यांनी दि.१० ऑगस्ट रोजी मार्गदर्शक श्रीकृष्ण मूर्ती ग्रंथ,टाळ,मृदुंगाचे पुजन यांच्या हस्ते करून श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवास सप्ताहास प्रारंभ झाला.