शिवसेनेकडून भाजपला पुन्हा मोठा धक्का;विद्यमान आमदारांच्या स्वीय सहाय्यकाच्या गावातच खिंडार.!विद्यमान सरपंचांनी घेतला भगवा झेंडा हाती

शिवसेनेकडून भाजपला पुन्हा मोठा धक्का;विद्यमान आमदारांच्या स्वीय सहाय्यकाच्या गावातच खिंडार.!विद्यमान सरपंचांनी घेतला भगवा झेंडा हाती

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर तालुक्यात शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपला मोठा धक्का देत सरपंच,ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला आहे. विशेष म्हणजे हा प्रवेश विद्यमान भाजप आमदारांच्या स्वीय सहाय्यकाच्या मूळगावी झाला असून त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन हा पक्षप्रवेश करण्यात आला.पक्षाचे सचिव संजय मोरे,धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक,सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते,जिल्हाप्रमुख मोहन पनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले व तुळजापूर तालुका प्रमुख अमोल जाधव यांच्या हस्ते नव्या कार्यकर्त्यांनी भगवा झेंडा हाती घेतला.

या वेळी अपसिंगा गावचे भाजप सरपंच अजित क्षीरसागर,ग्रामपंचायत सदस्य सुजित सोनवणे,सचिन रोंगे,पांडुरंग दिलपाक,आबा गुरव,सुरेश सुरडकर यांच्यासह वडगाव (देव) चे कपिल देवकते,वाणेगावचे सरपंच संभाजी कोरे पाटील,माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य मोहन ढेकले,माजी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य अप्पासाहेब पाटील यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यापूर्वीही शिवसेनेने तालुक्यातील अनेक भाजप सरपंचांचा प्रवेश घडवून आणला होता. आता पुन्हा एका मोठ्या लाटेत कार्यकर्ते व स्थानिक नेते भाजप सोडून शिवसेनेकडे वळत असल्याने तालुक्यातील राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता आहे.

या प्रसंगी तालुका प्रमुख अमोल जाधव म्हणाले,”ही तर फक्त सुरुवात आहे.येत्या काळात जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य तसेच तुळजापूर शहरातील माजी नगरसेवक यांचा पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते मोठा जाहीर प्रवेश होणार आहे.”

या पक्षप्रवेश कार्यक्रमास शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख गणेश नेते,तुळजापूर शहर उपप्रमुख रमेश चिवचिवे,युवा नेते शहाजी हाक्के,भुजंग मुकेरकर,रितेश जावळेकर,नितीन मस्के,स्वप्निल सुरवसे यांच्यासह असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुळजापूर तालुक्यात भाजपची पकड सैल करण्यासाठी शिवसेनेची ही सलग मोहीम कितपत यशस्वी होते आणि पुढे कोण कोण शिवसेनेच्या गळ्यात पडते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!