ड्रग्स कार्टेल मुळे शहराची कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह;गोपणीय चार मुख्य आरोपीना ताब्यात घ्या !
तुळजापूर शहरवासीयांचा जन आंदोलनचा इशारा…
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहर हे अलीकडच्या काळात ड्रग्स तस्करिसाठी कुप्रसिद्ध होत असुन, शहरात अवैध धंदे बोकाळले असुन पोलीसांचा धाकच राहीला नसल्याने खुलेआम तस्करांची मनमानी करीत एम डी ड्रग्ज विक्री चालु आहे. असे अरोप करीत कडक कारवाई कमीत गोपनीय चार नावे उघगड करीत त्यांना ताब्यात घ्या या मागणी साठी दि.१५ मार्च रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी तुळजापुर यांच्याकडे शहरवासीयांनी लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे .
या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, तुळजापुर शहरात गेली अनेक दिवसांपासून एम डी ड्रग्ज बाबतीत पोलिस तपास सुरु आहे.अनेक आरोपी अटक झालेले ही समजते परंतु अश्या परिस्थतीतही तुळजापुर शहरामध्ये आजही ड्रग्जची खरेदी आणि विक्री होत असल्याचे दिसुन येत असल्याचे समजते म्हणजेच या धंद्याचा मुळ विक्रेता आजुनही कारवाई पासुन दुर असल्याचे दिसुन येत आहे. सदरील ड्रग्ज प्रकरणातील गोपणीय चार मुख्य आरोपीना ताब्यात घेऊन मकोका कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करूण शहर वासियांना दिलासा द्यावा. अन्यथा तुळजापुर शहर वासियानकडून एम डी ड्रग्ज प्रकरणी मोठे जन आंदोलन केले जाईल. याची पोलिस प्रशासणाने नोंद घ्यावी. असेही या निवेदनात नमूद करण्यात आले असून या निवेदनावर माजी नगरसेवक नागनाथ भाऊ भांजी, माजी नगरसेवक राहुल खपले,अमरराजे कदम शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख , कॉग्रेसचे नेते ऋषिकेश मगर, युवा नेते अमोल कुतवळ,विजय भोसले, ॲड धीरज पाटील, शाम पवार, राष्ट्रवादी (अजित पवार गट )शहराध्यक्ष महेश चोपदार,धनंजय परमेश्वर, लक्ष्मण नन्नवरे ,बालाजी जाधव , शिवसेना शहर प्रमुख बापुसाहेब भोसले , वैजिनाथ पुजारी, उत्तम अमृतरावयांच्या सह शहरातील असंख्य नागरीकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.