ई-केवायसी नसल्यास रेशनचा लाभ बंद होणार – पुरवठा अधिकारी मनिषा कोळगे
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
सार्वजनिक वितरण प्रणालीतील सर्व रेशनकार्डधारकांची ई-केवायसी करण्याची प्रक्रीया राज्य सरकारने हाती घेतली आहे. कार्ड धारकांनी ई-केवायसी करुन घेतली नाहीतर रेशन धान्य् बंद होण्याची शक्यता आहे. प्रत्येक रेशनकार्डवरील प्रत्येक सदस्याला रेशन दुकानात जाउन ई-पॉस मशीन अंगठा लावुन ई-केवायसी करताना मध्येच सर्व्हर डाउन होत असल्यामुळे ई-केवायसी करताना अनेक अडचनी येत होत्या.
तसेच अनेक शिधापत्रीकाधारक नौकरी, व्यवसायाच्या इत्यादी निमीत्ताने बाहेरगावी रहात असल्याने त्यांना रेशनकार्ड असलेल्या त्यांच्या गावात येवुन ई-केवायसी करणेस सोईस्कर होत नव्हते. राज्य शासनाने यापुर्वी २८ फेब्रुवारी २०२५ पर्यतची अंतीम मुदत दिली होती. मात्र आत्ता त्यास ३० मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. दरम्यान ई-केवासी करुन घेण्यासाठी रेशन दुकानात जावुन तसेच Mobile app यादवारे या दोन्ही प्रकारे करता येईल. त्यासाठी केद्रंशासनाने आत्ता Mera e-kyc Mobile app व Aadhar Face RD Service app सुरु केले आहे. तरी सदर ॲप वापर करण्यासाठी खालील पदधतीचा अवलंब करावा. 1) गुगल प्ले स्टोअरवरुन Mera e-kyc Mobile app व Aadhar Face RD Service app व डाउनलोड करुन इन्स्टॉल करुन घ्यावे.
2) त्यानंतर Mera e-kyc Mobile app उघडल्यानंतर त्यामध्ये राज्य निवडा व ठिकान टाकावे. 3) आधार क्रमाक टाकल्यानंतर OTP मोबाईलला प्राप्त् होईल. सदर OTP रकानामध्ये टाकावे. 4) सदर माहीती भरल्यानंतर सबमिट बटनला क्लीक करावे. त्यावेळी मोबाईल स्कीनवर दिसणारी माहीती व्हेरीफाईड करावी. व सबमिट करावी.
5) त्यानंतर फेस E-KYC वर क्लीक करावे. सेल्फी कॅमेरा उघडल्यावर डोळे उघडझाप करावेत व फोटो काढुन होताच E-kyc पुर्ण झाली असा मेसेज येईल.
तरी सर्व रेशनकार्डधारकांनी आपल्या मोबाईलमध्ये Mera e-kyc Mobile app व Aadhar Face RD Service app डाउनलोड करुन त्याव्दवारे आपले ई-केवायसी करुन घ्यावे. असे आवाहन तुळजापुर तालुक्यातील सर्व कार्डधारकांना अरविंद बोळंगे तहसीलदार तुळजापुर व मनिषा कोळगे निरीक्षण अधिकारी पुरवठा यांनी केले आहे.