तुळजापुर शहरात होत असलेल्या वाढत्या चो-यांचे प्रकार, शहरातील अवैध धंदे बंद करा – महाविकास आघाडीचे पोलीस निरीक्षकांना निवेदन.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहरातील वाढत्या चोरीचे वाढते प्रमाणावर आळा घालण्यासाठीदिनांक, २१ जानेवारी २०२५ रोजी महाविकास आघाडीच्या वतीने तुळजापूर पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले, निवेदनात असे नमूद केले आहे की,गेले २-३ महिन्यापासुन चो-यांचे प्रमाण वाढले असुन दिवसा ढवळ्या घरफोडी, रस्त्यावर महिलेच्या गळ्यातील दागिणे पळवुन नेणे असे अनेक प्रचंड प्रमाणात घटना होत असुन सदरील तुळजापुर शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच चालले असुन यामुळे सर्वसामान्य जनता व येणरे भाविक हे भयभित झाले असुन या प्रकरणावरती आपणाकडुन कुठलीही ठोस कारवाई झालेली दिसुन येत नाही. विशेषतः शहरातील सर्वच बाजुच्या बाहेरील भागात विशेषतः असल्या चो-यांचे प्रकार व शस्त्रांचे धाक दाखवुन घरफोडी केली जात आहे. तुळजापुर शहरात प्रत्येक चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरा असुनही आपण दुर्लक्ष करत आहात याची खंत वाटते,तुळजापुर शहर हे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची पावन नगरी आहे त्याठिकाणी अशा चो-यांचे व दरोड्यांच्या घटनेमुळे तुळजापुर शहराचे नाव बदनाम होत आहे. तसेच तुळजापुर शहरात गेल्या महिन्यापासुन घरफोडी, रस्त्यावर लुट, महिलांच्या गळ्यातील दागिणे हिसकावुन घेणे, शस्त्र दाखवुन लुटणे अशा घटना घडत आहेत. तसेच तुळजापुर शहरात अवैध धंदे, ड्रग नशेली पदार्थांची विक्री होत असुन त्यामुळे गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडत आहेत व वरचेवर ड्रग्स नशेली पदार्थांची वाढ होत आहे. यामुळे शहरातील नागरिक व येणारे भक्त हैराण झाले आहेत.तरी मा. साहेबांना विनंती करण्यात येते की, वरील निवेदनाचा विचार करुन तुळजापुर मध्ये येणारे लाखो भाविकांना व तुळजापुर शहरातील नागरिकांवर होत असलेल्या अन्याय दुर करुन वरील सुविधा तात्काळ चालु करण्यात याव्या हि विनंती,नसता नाविलाजास्तव तुळजापुर महाविकास आघाडी व सर्व घटक पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी, यावेळी अमोल कुतवळ, अमर भैया मगर, शाम पवार,भाऊ भांजी,अक्षय कदम ,नरेश पेंदे,भरत जाधव,नवनाथ जगताप, बबन गावडे,सुधीर कदम,शंतनु कुतवळ,बाळासाहेब मुळे,अभिमान सगट,विकास भोसले,बापूसाहेब नाईकवाडी,सुदर्शन वाघमारे, चंद्रकांत साळुंखे,तसेच माय विकास आघाडी शहरातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.