तानाजी म्हेत्रे मराठवाडा भूषण आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित..
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळ
स्वातंत्र्यसंग्राम सेनानी कै.भानुदासराव जयवंतराव धुरगुडे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त मराठवाडा समन्वय समिती,पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा 2025 चा “मराठवाडा भूषण आदर्श शिक्षक” पुरस्कार महाराष्ट्र विद्यालय तीर्थ बुद्रुक येथील सहशिक्षक तानाजी सयाजी म्हेत्रे यांना प्रदान करण्यात आला.
पंचायत समिती कार्यालय तुळजापूर येथील प्रांगणामध्ये दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी हा कार्यक्रम घेण्यात आला. मराठवाड्यातील सहा शिक्षकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. ॲड. जी.आर.देशमुख – थोर स्वा.से.रामानंद तिर्थ स्मारक व सेवाभावी संस्था परभणी, प्रसिद्ध इतिहास संशोधक डॉ.श्रीमंत कोकाटे, मराठवाडा समन्वय समिती,पुणे अध्यक्ष राजकुमार बापू धुरगुडे, जयंती महोत्सव समिती अध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे, तुळजापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, माझी पंचायत समिती सभापती शिवाजी गायकवाड उद्या या सर्वांच्या वतीने तानाजी म्हेत्रे यांना मराठवाडा भुषण आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मानित करण्यात आला.