अलमप्रभू यात्रेने भूम नगरी गजबजली
भूम : औदुंबर जाधव
सालाबादप्रमाणे भूम येथील तीर्थक्षेत्र अलमप्रभू देवस्थानचा यात्रा उत्सव सुरु झाला, पहिल्या दिवशी रथाची मिरवणूक मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली . यावेळी हजारो भावीकभक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला . भारतीय जनता पार्टीच्यावतीनेही मेनरोडवर स्वागत केले आहे . संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले भूम येथिल जागृत देवस्थान श्री क्षेत्र अलमप्रभूचा यात्रा उत्सव २१ ते २३ डिसेंबर २०२४ या तीन दिवसात होत आहे . पहिल्या दिवशी मेनरोडने रथाची वाजत गाजत मिरवणूक काढली, यावेळी अनेक भाविकांनी नवसपूर्ती म्हणून पेढे वाटले, रथावर खोबरे खारका उधळल्या, ठिकठिकाणी भाविकांची दर्शनासाठी गर्दि होती, तहसिलसमोर शोभेची दारू उडवण्यात आली तर ह भ प भरत महाराज शिंदे यांचे किर्तन झाले , या यात्रा रथाचे मेनरोडवर भाजपच्यावतीनेही स्वागत केले, यावेळी देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष दिलीप शाळू, उपाध्यक्ष बाळासाहेब हूरकुडे, सचिव रविंद्र टेकाळे, विश्वस्थ हरिचंद्र पवार, श्रीकांत दिक्षित , शिवलिंग शेंडगे, सुधाकर पेंटर, ॲड संजय शाळू तसेच चंद्रकांत भगत गवळी, संतोष सुपेकर , बाबासाहेब वीर , पत्रकार शंकर खामकर, आकाश शेटे, सुरेश ऊपरे ,सिद्धार्थ जाधव ,आबासाहेब मस्कर ,रमेश मस्कर, राजाभाऊ बाराते , गणेश साठे आदिंचाही सहभाग दिसला .
