एमपीएससी परीक्षेत इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट- ब (राजपत्रित) या पदावर राज्यातून ५ व्या क्रमांकाने निवड झालेल्या बद्ल मंदिर संस्थानच्या वतीने सत्कार
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान चे सहाय्यक सुरक्षा निरीक्षक राज वडवले यांची एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट- ब (राजपत्रित) या पदावर राज्यातून ५ व्या क्रमांकाने निवड झालेल्या बद्ल त्यांचा मंदिर संस्थानच्या वतीने व्यवस्थापक तथा तहसीलदार श्रीमती माया माने यांनी सत्कार केला. यावेळी सहायक व्यवस्थापक अनुप ढमाले, रामेश्वर वाले सहायक व्यवस्थापक (स्थापत्य) राजकुमार भोसले, सहायक व्यवस्थापक (विद्युत) अनिल चव्हाण आणि मंदिर संस्थानचे कर्मचारी आदि उपस्थित होते.
