नैसर्गिक विधी साठी उभा असलेल्या युवकाचा रस्ता अपघातात मृत्यू

सोलापूर ते लातुर जाणारे रोडलगत नैसर्गिक विधी साठी उभा असलेल्या युवकाचा रस्ता अपघात मृत्यू

तुळजापूर : प्रतिनिधी

धाराशिव तालुक्यातील वाडी बामणी येथील राहिवासी ३५ वर्षाचा युवक शरद राजेंद्र माटे,हे दि.२८ डिसेंबर रोजी ८.३० वाजण्याच्या सुमारास तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ शिवारातील सोलापूर ते लातुर जाणारे रोडलगत नैसर्गिक विधी साठी उभा होते. दरम्यान अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे हायगयी व निष्काळजीपणे चालवून शरद माटे यास धडक दिली. या अपघातात शरद माटे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. नमुद अज्ञात वाहन चालक जखमीस उपचार कामी घेवून न जाता व अपघाताची माहिती न देता वाहनासह पसार झाला. असे अपघातात मृत्यु चे चौकशी मध्ये निष्पंन झाल्याने फिर्यादी संजय मुकुंदराव लोखंडे, सफौ/ ५३५ नेमणुक पोलीस ठाणे तुळजापूर यांनी दि. १३ डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पोलिस ठाण्यात भा.दं.वि.सं. कलम २७९,३३८,३०४(अ) सह १८४,१३४ (अ) (ब) मोवाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!