श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनाने ऊर्जा वाढते – सिनेअभिनेत्री मेधा मांजरेकर

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन आणि ऊर्जा वाढते प्रसिद्ध सिनेअभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी दि.११ डिसेंबर रोजी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्या नंतर मेधा मांजरेकर यांनी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या कार्यालयाला भेट दिली असता मंदिर संस्थानच्या वतीने तहसीलदार तथा व्यवस्थापक श्रीमती माया माने यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी सहायक जनसंपर्क अधिकारी प्रशांत जाधव, नागेश शितोळे, प्रतीक दिवाणजी आदी उपस्थित होते.

