तुळजाई दुर्ग प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या गड,किल्ले बनवणे स्पर्धेचे बक्षीस वितरण रविंद्र हायस्कूल,भूम येथे संपन्न.
भुम : औदुंबर जाधव
तुळजाई दुर्ग प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.शिवश्री विठ्ठल (अण्णा )बाराते सदस्य मा.श्री.शुभम पवार,तेजस अवताडे,पृथ्वीराज अवताडे,अभिषेक कराळे,ओम अवताडे,अभी सुरवसे यांच्या पुढाकाराने प्रशालेच्या गड किल्ले बनवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र,ट्रॉफी व रोख रक्कम देऊन सन्मानित केले.रोख रक्कम प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात आली.त्यात प्रशालेच्या दोन विद्यार्थ्यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला.त्यात अनुक्रमे यश कदम,कु.ज्ञानेश्वरी लोहार या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भूम पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मा.श्री.झराड साहेब, पोलीस कॉन्स्टेबल मा.श्री.जाधव साहेब हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते बक्षीस,प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.तसेच संस्थेचे सचिव मा.श्री.आर.डी.सूळ साहेब,उपमुख्याध्यापिका आदरणीय श्रीम.शर्मिला पाटील मॅडम,पर्यवेक्षक मा.श्री.मिलिंद लगाडे सर तसेच मा.श्री.धनंजय पवार सर,मा.श्री.भागवत लोकरे सर रविंद्र प्राथमिकचे मुख्याध्यापक मा. श्री देशमुख सर,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.