बांगलादेशमधील हिंदू बांधवावर होत असणाऱ्या अनन्वित अत्याचार थांबवावा -तिन्ही महंताच्या वतीने पंतप्रधान यांना निवेदन

बांगलादेशमधील हिंदू बांधवावर होत असणाऱ्या अनन्वित अत्याचार थांबवावा -तिन्ही महंताच्या वतीने पंतप्रधान यांना निवेदन

तुळजापूर : प्रतिनिधी

बांगलादेशमधील हिंदू बांधवावर होत असणाऱ्या अनन्वित अत्याचार थांबविणेबाबत व त्यांना सुरक्षा देणेबाबत. दि.४ डिसेंबर रोजी तिन्ही महंतांच्या उपस्थितीत नरेंद्र मोदी पंतप्रधान यांना तहसीलदार मार्फत निवेदन सकल हिंदू समाज यांनी निवेदन दिले आहे.निवेदनात असे नमूद केले आहे की,तिन्ही महंत संपूर्ण जगभरामध्ये हिंदू धर्माचे अनुयायी वास्तव्यास आहेत. ते सर्व लोक त्या त्या देशाच्या कल्याणासाठी स्वतःचे अखंडपणे योगदान देत आहेत. ज्याप्रमाणे बांगलादेश या ठिकाणी हिंदू समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास असून त्या देशासी प्रामाणिक राहून ते वास्तव्यास आहेत, परंतू बांगलादेशमध्ये सत्तांतर होवून अंतरीम सरकारची स्थापना झालेली असून सरकार बदलानंतर हिंदू धर्मियांवरती अनन्वीत अत्याचार, महिलांवरती बलात्कार तसेच नृशंस हत्या सत्र चालू आहे, ज्यामध्ये अंतरीम सरकार हिंदूना कुठलीच सुरक्षा प्रदान करत नसल्याचे लक्षात येत आहे, यामध्ये इस्लामीक आतंकवाद वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. शेजारील घराला आग लागलेली असताना ती वेळीच विजवली गेली नाही तर त्याची धग आपल्या घराला (देशाला) लागल्याशिवाय राहणार नाही. तरी हे सर्व हत्यासत्र व अत्याचार थांबविण्यासाठी भारत सरकारने वेळीच उपाययोजना बांगलादेशमधील सर्व हिंदू बांधवांना सुरक्षित व भयमुक्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून शीघ्र गतीने प्रयत्न करावेत बांगलादेशमधील असलेला प्रत्येक हिंदू हा आमचा धर्मबांधव आहे, त्याच्यावरील अत्याचार यापुढे हिंदू समाज कदापी सहन करणार नाही तरी याची आपण गंभीरतेने दखल घ्यावी. असा हि एका लेखी निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!