तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात अनधिकृत पवनचक्की अनागोंधी कारभार कधी थांबणार

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

पवनचक्की रिन्युव्ह कंपनी यांनी तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात अनधिकृत पवनचक्की बसवत असून शेतकऱ्यांना दमदाटी करून मावेजा न देता चुकीचा पद्धतीने गुंड लोकांकडून दमदाटी करून जमीन बळकवत असलेबाबत २ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना लेखी निवेदन दिले आहे.तुळजापूर येथे सामाजिक कार्य करत असून, २९/११/२०२४ रोजी मेसाई जवळगा येथील जमीन धारकांचा शेतात रिन्युव्ह कंपनी पवनचक्की धारक हे अनधिकृत शेतात येऊन त्रास देऊन. त्यान्या जीवे मारण्याची वनकी देत आहे असे विशाल रोचकरी यांना कळल्यानंतर ते स्वतहा हजर असताना तेथे पवनचक्की कंपनी चे लोक हे पुणे येथील ४० ते ५० लोक घेऊन येथे हजर होते तेथील शेतकऱ्यांना त्रास देत असून दमदाटी करत होते. तसेच त्यांच्या शेतातू अनधिकृत पणे पिकाची नुकसान करत होते त्यांना समजावून सांगितले त्यावेळी त्यांनी त्या दिवसी काम बंद केले. परंतु पुन्हा शेतकऱ्यांना त्रास देत असून, अनधिकृत पणे पिकाची नुकसान करत आहे.तरी याबाबत योग्य ती चौकशी होऊन शेतकर्यांना न्याय द्यावे त्या लोकांन विरुद्ध अनधिकृत शेतात घुसून व दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देत असून त्यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करून त्यांना पायबंद करावे अन्यथा उपोषण करण्यात येईल याची दखल घ्यावी असा इशारा भाजपा नेते नगरसेवक विशाल रोचकरी यांनी एका लेखी निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!