आरोग्यवर्धिनी केंद्राच्या वेळेत बदलआता दुपारी १२ ते रात्री ८ वाजतापर्यंत सुरू राहणार
धाराशिव : प्रतिनिधी
पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत जिल्हयात मंजूर असलेल्या २२ शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र आणि ५ हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांचे रुग्णालयीन कामकाजाच्या वेळेमध्ये पुढीलप्रमाणे बदल करण्यात आला आहे. शहरी आरोग्यविर्धीनी केंद्राची पुर्वीची वेळ ही दुपारी २ ते रात्री १० वाजतापर्यंत होती.आता सुधारित वेळ ही दुपारी १२ ते रात्री ८ वाजतापर्यंत असणार आहे.हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाची पुर्वीची वेळ ही दुपारी २ ते रात्री १० वाजतापर्यंत होती.आता सुधारित वेळ ही दुपारी १२ ते रात्री ८ वाजतापर्यंत असणार आहे. वरील सुधारीत वेळापत्रक ९ डिसेंबर २०२४ पासुन लागू करण्यात येणार आहे.जिल्हयातील नागरिकांनी व रुग्णांनी याची नोंद घ्यावी.असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटीचे सदस्य सचिव डॉ.सतीश हरिदास यांनी केले आहे.