धाराशिव तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार; ढोकी-तेर परिसरात पूरसदृश परिस्थिती, प्रशासन सतर्क!
धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी
मुसळधार पावसामुळे धाराशिव तालुक्यातील ढोकी आणि तेर परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तेरणा नदीला पूर येण्याची शक्यता वर्तवली जात असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
अतिवृष्टीमुळे ढोकी, तेर आणि तेरणा नदीलगतच्या गावांमध्ये पाण्याचा तडाखा जाणवू लागला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली असून रस्ते व पुलांवरून पाणी वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, तसेच पाण्याखाली गेलेले रस्ते व पुलांचा वापर करणे टाळावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पूरस्थिती गंभीर झाल्यास नागरिकांनी तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे. यासाठी आपत्कालीन संपर्कासाठी विशेष हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आले आहेत.
📞 आपत्कालीन संपर्क क्रमांक
डॉ. मृणाल जाधव,तहसीलदार धाराशिव : 9657576714
महादेव शिंदे, निवासी नायब तहसीलदार धाराशिव : 9689046650
शरद पवार, मंडळ अधिकारी तेर : 9272095252
तोगरे, मंडळ अधिकारी ढोकी : 9552052245
दत्ता कोळी, मंडळ अधिकारी येडशी : 9860100565
नागरिकांनी कोणतीही अडचण उद्भवल्यास त्वरित वरील क्रमांकांवर संपर्क साधावा. प्रशासनाने स्पष्ट केले की परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी उपाययोजना सुरू आहेत.