शिवाजीराव बोधले व नन्नवरे यांचे नेतृत्व कार्यकर्त्यांना बळ देणारे;मा.आमदार ठाकुर यांच्या हस्ते जिल्हा उपाध्यक्षांचा सत्कार‎

शिवाजीराव बोधले व नन्नवरे यांचे नेतृत्व कार्यकर्त्यांना बळ देणारे;मा.आमदार ठाकुर यांच्या हस्ते जिल्हा उपाध्यक्षांचा सत्कार‎

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

जिल्ह्यात भाजपचे संघटन दिवसेंदिवस अधिक भक्कम होत आहे. जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या यशस्वी वाटचालीत शिवाजीराव बोधले व नारायण नन्नवरे तसेच नागेश नाईक यांचे नेतृत्व कार्यकर्त्यांना नवे बळ देईल, असा विश्वास माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांनी व्यक्त केला. भाजप धाराशिव नूतन जिल्हा उपाध्यक्षपदी शिवाजी बोधले व नारायण नन्नावरे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांचा दि.९ सप्टेंबर रोजी परंडा येथे मंगळवारी सत्कार केला. त्या प्रसंगी आमदार ठाकूर बोलत होते.

तुळजापूर येथील भाजपचे नेते शिवाजी बोधले, समर्थ पतसंस्था बँकेचे चेअरमन नारायण नन्नवरे, ज्येष्ठ नेते नागेश नाईक यांची जिल्ह्याच्या कार्यकारणी मध्ये निवड झाल्याबद्दल भाजपचे माजी प्रदेश सरचिटणीस माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांच्या हस्ते परंडा येथे सत्कार करण्यात आला. तुळजापूर शहरातून जिल्हा कार्यकारणी व निवड झालेल्या या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केल्यानंतर विविध राजकीय आणि संघटनात्मक विषयावर याप्रसंगी अनौपचारिक चर्चा संपन्न झाली.

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पालिकांमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासह बहुतांशी मीनी मंत्रालय जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला विजय मिळवण्याचा पक्षाचा प्रयत्न असेल. त्याच, पार्श्वभूमीवर या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. राजकीय आरक्षणासह या निवडणुका घेण्यात याव्यात. पुढील ३ ते ४ महिन्यात निवडणुकांचा कार्यक्रम आखणी करुन निवडणुका घ्याव्यात, असे निर्देशच सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे, या निवडी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!