खुंटेवाडी येथील अँड.हणमंत जाधव यांची अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेच्या प्रदेश विधी सल्लागार” पदी नियुक्ती
तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी येथील रहिवासी तथा भिवंडी कोर्टात वकिली व्यवसाय करीत असलेले अँड.हणमंत माणिक जाधव यांची अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेच्या प्रदेश विधी सल्लागार” पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. संजय पाटील,महाराष्ट्र प्रदेश महासचिव श्री. जयेश शेलार-पाटील यांनी त्यांना नुकतेच नियुक्ती पञ देऊन त्या पञात आपण कुर्मी समाजाच्या विकास व उन्नती करिता प्रामाणिक, निस्वार्थ पणे व समर्पित भावनेने कार्य करीत आहात. आपले सामाजिक क्षेत्रातले योगदान निश्चितपणे भावी पिढीला मार्गदर्शक ठरावे. तसेच समाजसेवा हिच ईश्वर सेवा हे व्रत आपण अंगीकारल्याने आपली बुद्धी, कौशल्य समाजाला देण्याकरता आपण कटिबद्ध असल्याने आपणास प्रदेश विधी सल्लागार” या पदावर सर्व संमतीने नियुक्त करण्यात येत असल्याचे सांगन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.