तुळजापूर खुर्द येथील गणराया अनावश्यक खर्चाला फाटा देत सांस्कृतिक परंपरा,सार्वजनिक एकोप्याचे जतन करत धार्मिक वातावरणात गणेश विसर्जन

तुळजापूर खुर्द येथील गणराया अनावश्यक खर्चाला फाटा देत सांस्कृतिक परंपरा,सार्वजनिक एकोप्याचे जतन करत धार्मिक वातावरणात गणेश विसर्जन

तुळजापूर:-तुळजापूर खुर्द येथील नरसिंह तरुण मंडळ यांचे गणेश विसर्जन मिरवणूकीत शहराच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करत गणेश मंडळाने पारंपरिक पद्धतीने अतिरिक्त खर्च टाळून काल सायंकाळी तुळजापूर खुर्द येथील नरसिंह तरुण मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान भक्तीभाव, उत्साह, कलात्मकता, सार्वजनिक शिस्त, सार्वजनिक एकोपा अनुभवयाला मिळाला. श्रद्धा आणि भक्तिभावाने निघालेली ही मिरवणूक दैदिप्यमान होती. गणेश मंडळांनी सादर केलेले देखावे आकर्षक ठरले, तर चिमुकल्या मुलांनी वारकरी वेशभूषेत सादर केलेल्या नृत्यांनी सगळ्यांचे मन जिंकले.

पारंपरिक वाद्यांच्या गजरासह आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या !’ या जयघोषाने मिरवणूक परिसर धुमधुमुन गेला होता. याप्रसंगी तुळजापूर खुर्द येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी. नरसिंह मित्र म़ंडळाचे सर्व सभासद व पदाधिकारी व गावातील महीला मंडळ सर्व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!