तुळजापूर ड्रग्स प्रकरणातील आरोपी जगदिश पाटील यांना जामीन मंजूर – ॲड विशाल साखरे
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
महाराष्ट्र राज्यभरात गाजत असलेले ड्रग्ज प्रकरण राजकीय आखाडा ठरलेले तुळजापूर एम डी ड्रग्स प्रकरण सातत्याने चर्चेत आहे.तुळजापूर ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयाने जगदीश जिवनराव कदम-पाटील यांना नियमित अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे.यांच्या वतीने ॲड विशाल प्रभाकर साखरे यांनी अत्यंत प्रभावीपणे व मुद्देसूद कोर्टात बाजु मांडली.
प्रकरण काय होते ?
तुळजापूर येथील एम.डी. ड्रग्स प्रकरणातील आरोपी नानासाहेब कुऱ्हाडे यांच्या विरुद्ध तामलवाडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. २२/२०२५ विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात ३८ आरोपी असुन ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात ३ आरोपी अद्याप फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत यात अलोक शिंदे, उदय शेटे, विनोद उर्फ पिटू गंगणे, रणजीत पाटील, शुभम नेपते, दुर्गेश पवार, अभिजीत अमृतराव व राजू उर्फ पिट्टा सुर्वे, शामकुमार भोसले, टिपू सुलतान शेख, नानासाहेब खुराडे, पिनू तेलंग, विनायक इंगळे, जगदीश पाटील या १४ जणांना जामीन मिळाला आहे.
सदर प्रकरणात ॲड. विशाल साखरे यांना ॲड मंजुषा साखरे,ॲड. महेश लोहार,ॲड. शुभम तांबे,ॲड. अमित गोळे,ॲड. अर्चना कांबळे,ॲड.आकाश एडके,ॲड. उदय आडेकर,ॲड. लक्ष्मीकांत कुलकर्णी,ॲड. संकेत गोरे, ॲड, प्रथ्वीराज खोचरे,ॲड .ओंकार कोरेगावकर, महेश पवार, रोहित लोमटे यांनी सहकार्य केले.
पोलिस अधीक्षक रितु खोकर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तामलवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकूर हे तपास करीत आहेत.