यंदा रणसम्राट कबड्डी संघ, गणपतीच्या प्रथम आरतीचा मान तुळजापूर तालुकापत्रकार संघाला…
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
शहरातील रणसम्राट कबड्डी संघ, गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणपतीच्या प्रथम आरतीचा मान यंदा पत्रकार संघाला दिला आहे, ज्यामुळे तुळजापूरातील पत्रकार संघाला हा विशेष मान मिळाला आहे. यावेळी श्री तुळजाभवानीच्या व गणरायाच्या चरणी शेतकरी बांधव सुखी राहावेत व लेखणीच्या माध्यमातून जनतेची व शेतकरी बांधवांची सेवा करता यावी यासाठी पत्रकार संघाच्या वतीने प्रार्थना करण्यात आली.
रणसम्राट कबड्डी संघ, गणेश मंडळ श्री तुळजाभवानी मंदिर महाद्वार चौकात रणसम्राट कबड्डी संघ गणेश मंडळाची स्थापना १९४४ ची आहे.पत्रकार यजमानांचे सत्कार करताना मंडळाचे अध्यक्ष अक्षय दिलीपराव करडे यांनी गणरायाची चांदीची प्रतिमा व वृक्ष देऊन झाडे लावा, झाडे जगवा आसा संदेश देत सत्कार करण्यात आला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष अक्षय दिलीपराव करडे (पाटील),उपाध्यक्ष अर्जुन अमृतराव, संजय साळुंके ,कोषाध्यक्ष अभय पलंगे,स्वराज खुंटाफळे,सचिव समर्थ क्षिरसागर,केदार बळवंते,
सह सचिव ओम रोचकरी,अभिषेक छत्रे,मिरवणूक प्रमुख दिनेश कापसे, सागर परमेश्वर आदि उपस्थित होते.