गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर मा.पोलीस अधीक्षकांचे जनतेस आवाहन.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर मा.पोलीस अधीक्षकांचे जनतेस आवाहन.

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

दि. २७ ऑगस्ट ते दि.६सप्टेंबर या काळात साजरा होणारा गणेशोत्सव शांततेत पारपाडण्यासाठी जिल्ह्यात हजारोंच्या संखेने सार्वजनिक गणेश मंडळे मुर्ती स्थापना करुन सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. यातुन त्यांच्या नेतृत्व गुणांना वावही मिळतो. परंतु यावेळी काही प्रसंगी अति उत्सहाच्या भरात काही समाज विघातक आक्षेपार्ह देखावे बांधतात त्यातून सामाजिक ऐक्य व शांतता यास बाधा होण्याची शक्यता असते. तरी सर्व सार्वजनिक मंडळांनी आक्षेपार्ह देखावे उभारु नये व सार्वजनिक मंडळांनी आपली नोंदणी नजीकच्या पोलीस ठाण्यात करुन आवश्यक असल्यास ध्वनी परवानेही घ्यावेत व मिरवणुक प्रसंगी वहातुकीच्या नियमांचे पालन करावे. तसेच ‘एक गाव एक गणपती’, ‘एक गल्ली एक गणपती’ इत्यादी स्वरुपांच्या संकल्पना राबवाव्यात, ध्वनी प्रदुषण नियंत्रण अधिनीयम तसेच ध्वनी प्रदुषण नियम याचे काटेकोरपणे पालन करावे, वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही अगर हमरस्त्यावर मंडप उभारुन आमजनतेची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच देखावा पाहण्यासाठी येणाऱ्या महिलांच्या सुरक्षीततेसाठी स्वतंत्र रांगा लाउन स्वयंसेवकांची नेमणुक करावी. तसेच धाराशिव जिल्ह्यात गणेशोत्सव शांततेत पारपाडण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यलयाकडून पोलीस उप अधिक्षक ४ पोलीस निरीक्षक १९ सहाय्यक पोलीस निरीक्षक ४०, पोलीस उप निरीक्षक ५०, पोलीस अमंलदार 1600 एस आर पी एफ १ प्लॉटून, ७७० होमगार्ड असा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त नेमण्यात आला आहे.गणेशोत्सव दरम्यान सर्व नागरीकांनी सतर्क रहावे, कोणी धार्मीक भावना दुखावनार नाहित किंवा सुरक्षीततेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशा अफवा पसरवु नयेत. मा. पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांनी असे आवाहन जनतेस केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!