आईचा खून करुन,आत्महत्येचा बनाव,लोहाऱ्यातील धक्कादायक घटना
मुलगा व सुनेवर गुन्हा दाखल करू आरोपी ताब्यात घेतले.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
धाराशिव जिल्ह्यातील लोहारा येथी कौटुंबिक वादातून आईचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुलगा आणि सुनाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि.२५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी१२ ते १ वाजण्याच्या सुमारास उमाबाई सुरेश रणशुर वय 55, रा. लोहारा यांना घरगुती वादातून आरोपी सौदागर सुरेश रणशुर व त्याची पत्नी पूजा सौदागर रणशुर,दोघे रा.लोहारा यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर उमाबाईला ठार मारून, साडीने गळफास लावून आत्महत्येचा बनाव केला,असा आरोप आहे.या घटनेची फिर्याद महेश सुरेश रणशुर वय३५, रा. लोहारा, ह.मु. शिवहरी ग्रीन सिटी, वापी, जि.वलसाड, गुजरात यांनी लोहारा पोलीस ठाण्यात नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भा.न्या.सं. कलम 103(1), 352 तसेच 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.पोलीस प्रशासनाकडून मिळालेली माहितीनुसार घटनेनंतर उमाबाई रणशुर यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. परंतु चौकशीतून मारहाण व खुनाचे स्पष्ट झाले. या खुनप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे हे करीत आहेत.