आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा मंत्र्यांनी उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्तुती करणे या गोष्टींचा आणि ड्रग्स प्रकरणाचा कसलाच संबंध येत नाही – ॲड विशाल साखरे

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा मंत्र्यांनी उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्तुती करणे या गोष्टींचा आणि ड्रग्स प्रकरणाचा कसलाच संबंध येत नाही – ॲड विशाल साखरे

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पवित्र तीर्थ क्षेत्र तुळजापूर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी धाराशिव जिल्हा विकास कामा चा एक आदर्श निर्माण केला म्हणून त्यांचा भव्यदिव्यनागरी सत्कार करण्यात आला व या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला. ज्या व्यक्तीचे योगदान आहे त्यांचा सन्मान होणे हे विधीचे विधान आहे. या बद्दल दुमत नाही.परंतु सदर कार्यक्रमात मंत्री महोदय बावनकुळे यांनी सदर कार्यक्रमाचे नियोजन कर्ते विनोद ऊर्फ पिटू गंगणे भाजपा पदाधिकारी यांनी अत्यंत चांगले नियोजन केले या बद्दल त्यांचा उलेख करून सन्मानाची थाप दिली. या गोष्टी वरून अनेक राजकीय वादंग निर्माण करून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची राजकीय हेतू ठेऊन बदनामी करण्याचा जो प्रयत्न (उबाठा गट) चे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्यांचे मत व्यक्त करून प्रसार माध्यमातून सांगितले की, विनोद ऊर्फ पिटू गंगणे भाजपा पदाधिकारी हे ड्रग्स प्रकरणात आरोपी असून त्यांना जेल मध्ये ठेवण्यात आले होते. व नुकतेच जामिनावर सोडण्यात आले आहे. अशा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची पाठराखण करणे म्हणजे तुळजापूर ड्रग्स प्रकरणातील पोलिस प्रशासन वर प्रश्न चिन्ह आहे.

 

सत्ताधारी पक्षाचे जिल्हा प्रवक्ते विशाल साखरे यांनी बोलताना म्हणाले कि खासदार हे त्यांच्या पक्षाच्या भूमिकेतून जनतेचे प्रश्न सोडवता संसदेत चांगले प्रश्न मांडता या बद्दल दुमत नाही. तसेच ड्रग्स प्रकरण संधर्भात कायद्याच्या तरतुदींचे अवलोकन करणे व प्रतिबंध करणे या मताशी साखरेही सहमत आहेत. परंतु एक कायद्याची प्रक्रिया अवलंबणे गरजेचे आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी कार्यक्रमाचे अवचित्य प्रमाणे दोन हजार कोटी निधी ची तरतूद मंजूर करून आणल्याने व अनेक विकासकामे केले असल्याने त्या बाबत नागरी सत्कारामध्ये विनोद ऊर्फ पिटू गंगणे भाजपा पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन करणे अथवा त्या साठी मंत्री यांनी त्यांचा उत्कृष्ट कामाबद्दल स्तुती करणे या गोष्टींचा आणि ड्रग्स प्रकरणाचा कसलाच संबंध येत नाही. वास्तविक कार्यक्रम प्रक्रिया ही त्यांचे व्यक्ती स्वातंत्र्य आहे.

त्या वर खासदार गदा आणू शकत नाहीत. वास्तविक विकास काम होत असेल तर ते मोठ्या मनाने मान्य करायला हवे. याचा राजकीय वादंग करून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची या ड्रग्स प्रकरणाशी संबंध जोडून टीकात्मक प्रतिक्रिया देणे बदनामी कारक आहे.

“जो पर्यन्त कोणताही गुन्हा माननीय न्यायालयात सिद्ध होत नाही तो पर्यन्त तो व्यक्ती हा अपराधी आहे. असे म्हणणे कायद्याच्या विरुद्ध आहे.”

“आरोप जोपर्यंत सिद्ध होणार नाहीत तो पर्यंत सदर आरोपीस देखील कायद्याने हक्क व अधिकार दिले आहेत.”

मग सदर व्यक्तीस न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली नसताना त्यास अपराधी तसेच त्या व्यक्तीच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर, म्हणजे भाष्य, कार्यक्रमाचा सहभाग, अथवा त्याचे मूलभूत अधिकाराचे उलंघन केल्या सारखे आहे.तसेच ड्रग्स rehabilitation प्रक्रिया या बाबत NDPS ACT मध्ये तरतुदी दिल्या आहेत.

तो कायद्याच्या प्रक्रियेचा भाग आहे. विनोद ऊर्फ पिटू गंगणे या भाजपा पदाधिकाऱ्यांनी धाराशिव जिल्हा न्यायालयात त्याचा अटक पूर्व जमीन ठेवला होता तसेच तो नामंजूर झाला त्या नंतर अटक केली. आणि कायदेशीर प्रक्रियेने माननीय उच्च न्यायालयाने जमीन दिला आहे. मग पोलिस प्रशासनावर विनाकारण प्रश्न चिन्ह कशासाठी न्यायालयीन प्रक्रियेबाबत बोलताना गांभीर्य बाळगुन बोलणे आवश्यक आहे.ही राजकीय बदनामी थांबवावी जेणे करून समाजात जनतेस संभ्रमात होणार नाही.असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(अजित पवार गट) सत्ताधारी पक्षाचे जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगरसेवक ॲड, विशाल प्रभाकर साखरे प्रसिद्धी पत्रकातून जाहीर केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!