तुळजापूर येथी सिद्धेश यांची सैन्यदलात लेफ्टनंटपदी निवड
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहरातील रहिवासी सिद्धेश शाम शिंदे यांची भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट पदावर निवड झाली आहे.सिध्देश यांनी एनसीसी विशेष प्रवेश योजनेद्वारे प्रतिष्ठित एसएसबी मुलाखत उत्तीर्ण होत चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीत १२ महिन्यांचे कठोर प्रशिक्षण पूर्ण केले. सध्या आर्मी एव्हिएशन कॉर्म्समध्ये आयोगित अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
ही शाखा लष्करी कारवाईतील महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी व अत्यंत जबाबदाऱ्यांसाठी ओळखली जाते.या यशामुळे संपूर्ण शिंदे कुटुंबिय आनंदित झाले असून, सिद्धेश यांनी मेहनत, शिस्तबद्ध वृत्ती आणि चिकाटीमुळे हे यश मिळवले आहे. चेन्नईतील दीक्षांत सोहळ्यात सिद्धेश यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी आजी विमल शिंदे, वडील शाम शिंदे, आई वैशाली शिंदे, चुलते मुकुंद शिंदे, सविता शिंदे व बहिण समृद्धी शिंदे उपस्थित होते. सिद्धेश यांच्या या कामगिरीचे मित्रपरिवार, व तुळजापूर शहरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.