वधू-वर परिचय मेळाव्याच्या अंतिम तयारीसाठी 12 मे रोजी संयोजन समितीच्या बैठकीचे आयोजन

तुळजापूर येथील वधू-वर परिचय मेळाव्याच्या आयोजनाची जय्यत तयारी;

वधू-वर परिचय मेळाव्याच्या अंतिम तयारीसाठी 12 मे रोजी संयोजन समितीच्या बैठकीचे आयोजन

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

मराठा समाजातील तरुण-तरुणींसाठी सकल मराठा समाज यांच्या विद्यमाने आयोजित वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे. येत्या रविवार 25 मे रोजी मोफत व भोजन व्यवस्थेसह सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत हा मेळावा तुळजापूर येथील नळदुर्ग रोडवरील श्रीनाथ मंगल कार्यालयात होणार आहे. यामध्ये वधूंवरांना कुठलीही नावनोंदणी फी द्यावी लागणार नाही.

सध्या महाराष्ट्रभर सकल मराठा समाजाच्या वतीने विनाशुल्क मराठा वधु वर मेळावे घेतले जात आहेत. नुकताच 13 एप्रिल रोजी धाराशिव येथे मराठा समाज वधू वर मेळावा यशस्वी पार पडला आहे.

मराठा समाजातील विवाहेच्छुक युवक-युवती तसेच त्यांच्या पालकांना अनुरूप स्थळ शोधून विवाह जुळवण्याची सुवर्णसंधी तुळजापूर येथील मेळाव्याच्या निमित्ताने मिळणार आहे. या मेळाव्यात, वधू आणि वर यांच्या कुटुंबीयांनी एकमेकांना ओळख करून द्यायची आहे. यामध्ये प्रामुख्याने नाव,वय,शिक्षण, व्यवसाय आणि कौटुंबिक पार्श्वभूमी यासारखी माहिती द्यायची आहे.

मराठा समाजातील वधू वर व पालकांनी या मेळाव्यास उपस्थित राहताना प्रत्यक्ष वधूवरांनी उपस्थित राहावे लागणार आहे. तसेच मेळाव्यास येताना त्यांनी येताना दोन प्रतीमध्ये बायोडाटा व आयकार्ड साईज दोन सोबत घेऊन उपस्थित राहावे असे आवाहन असे आवाहन संयोजन समितीमधील प्रा.अभिमान हंगरगेकर,अशोक गायकवाड, गणेश पुजारी,अमोल निंबाळकर,उत्तमराव (नाना) अमृतराव,चंद्रशेन देशमुख ,
कृष्णा रोचकरी,उमाजी गायकवाड,सुहास साळुंके,अर्जुन जाधव,अशोक ठोंबळ,ॲड.रमेश भोसले, विश्वास मोटे,अशोक चव्हाण, नागनाथ वाघ, दत्तात्रय तेलंग-कदम,हनुमंत भालेकर, अभिजीत जाधव,नवनाथ पवार, रमाकांत लोंढे, बिबीशन मोरे, गोरोबा लोंढे,राजेंद्र कदम, चंद्रकांत भांजी, राजीव तांबे, विजय पवार,अण्णासाहेब कदम,राहुल जाधव आदींनी केले आहे.

या मेळाव्याच्या माध्यमातून लग्नाळू उमेदवारांची लग्न जमण्यासाठी निश्चित मदत होणार

या मेळाव्यात विवाह इच्छुक मुला मुलींनी आपल्या या मेळाव्याच्या माध्यमातून लग्नाळू उमेदवारांची लग्न जमण्यासाठी निश्चित मदत होणार

या मेळाव्यात विवाह इच्छुक मुला मुलींनी आपल्या पालकांसोबत उपस्थित राहून स्वतःचा परिचय व अपेक्षा बोलून दाखवायच्या आहेत. या मेळाव्यामुळे मराठा समाजातील इच्छुक लग्नाळु उमेदवारांची लग्न जमण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे स्वतः तसेच आपल्या घरच्या मंडलींना बरोबर घेऊन या मेळाव्यात सहभागी व्हावे.
–अशोक गायकवाड,
संयोजन समिती,तुळजापूर

वधू-वरांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळणार
वधु वर मेळावा हे एक समाजोपयोगी व पारंपरिक पद्धत आहे, तुळजापूर येथील भव्य मराठा वधू-वर मेळाव्याच्या माध्यमातून इच्छुक वधू आणि वर यांच्या कुटुंबीयांना एकमेकांना भेटण्याची आणि विवाह संबंधाची चर्चा करण्याची संधी मिळणार आहे.
–प्रा.अभिमान हंगरगेकर
संयोजन समिती,तुळजापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!