तुळजापूर तालुक्यात होर्टी, जळकोट, मुर्टा, किलज परिसरात टाटा पवन चक्की कंपनीने गौण खनिजाचा बेकायदा उपसा
सरकारला कोट्यवधी रुपयांच्या महसूलावर हातोडा ?
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तालुक्यात अनेक ठिकाणी टाटा पावर पवन चक्की कंपनीने गौण खनिजाचा बेकायदा उपसा व चोरी होत असल्यामुळे सरकारला कोट्यवधी रुपयांच्या महसूलावर पाणी सोडावे लागत आहे. सरकारला कोट्यवधी रुपयांचा महसूल देणाऱ्या गौण खनिज विभागातील तुळजापूर तालुक्यातील होर्टी, जळकोट, मुर्टा, किलज परिसरात एका टाटा पावर पवन चक्की कंपनीने शासनाचा मसूल बुडवत हजारो ब्रास गौण खनिजाचा बेकायदा उपसा व चोरी होत आहे. मात्र तालुक्यातील होर्टी, जळकोट, मुर्टा, किलज सज्जातील तलाठी टाटा पावर कंपनी कडून चिरीमीरी घेवून कंपनीला आश्रय देत आहेत.
गौण खनिज विभागामार्फत माती, मुरूम, दगड यांच्या रॉयल्टीद्वारे विभागाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो, मात्र तुळजापूर तालुक्यातील दगड खदानींमधून होणारे अवैध उत्खनन यामुळे सरकारला फटका बसत आहे.
टाटा पावर पवन चक्की कंपनी मुळे आणि इतर काही कंपन्यामुळे तालुक्यात
अवैध मुरूमउपसा व दगडखाणींमधून होणाऱ्या अवैध उत्खनानाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.
स्थानिक महसूल व पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सर्रास अवैध उत्खनाचा उपसा सुरू असल्याच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणावर आहेत.
अवैध उपसा करून राजरोसपणे कंपनीला विक्री करण्यात येत असल्यामुळे प्रशासनाकडून कारवाई येते, मात्र गौण खनिज, महसूल व पोलिस प्रशासनात सुसूत्रता नसल्यामुळे कारवाईची संख्या अत्यंत कमी आहे.