जमिनीतून रहस्यमयी आवाज येतो, का, कसा, कुठून? कळेना; लोकांमध्ये घबराट
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातीत गुरुवार दि १९ डिसेंबर रोजी दुपारी १२.०५ वाजता जमिनीतून मोठा आवाज आला. या आवाजाने घरात असलेले नागरीकात भयभीत झाले होते. या आवाजाने शहरात कोणतीही हाणी झाली नाही. मात्र, शहरात व ग्रामीण भागात भयभित झाले आहेत. तुळजापूर व धाराशिव तालुक्यातील काही गावातदेखील हा आवाज आल्याचे गावकरी सांगत आहेत. मागच्या अनेक वर्षांपासून जमिनीतुन गुढ आवाज येत आहेत. आतापर्यंत अनेक वेळेस असे आवाज आल्याचे शहरातील नागरीक सांगत आहेत. मागच्या काही वर्षांपुर्वी हे आवाज वर्ष सहा महिण्याला येत असत. मात्र, मागच्या चार ते पाच वर्षांपासून हे आवाज होत आहे.