तुळजापूर : प्रतिनिधी
सरकारी कामं आणि जरा थांब .अशी कथा या कार्यालयाची झाली असून या कार्यालयामध्ये कार्यरत असणारी मुख्यालय सहाय्यक सह अधिकारी वर्ग हा पुणे,लातूर व धाराशिव या ठिकाणी राहत असून मुख्यालयात राहणे बंधनकार असताना आदेशाची पायमल्ली करत वरिष्ठांच्या अभय मुळे सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय करत असल्याचा प्रकार तुळजापूर येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय येथील असून संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी 22 नोव्हेंबर रोजी उपाधीक्षक भूमी अभिलेख तुळजापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती .या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय तुळजापूर येथे सातत्याने वर्दळीचे ठिकाण असून मंगळवार व इतर दिवशी ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग तसेच शहरवासीय व गावकरी पी आर कार्ड, टोच नकाशा ,काढण्यासाठी शासकीय कार्यालयात येत असतात .सदर कार्यालयाच्या वेळेत पाहिलं असता कर्मचारी हे बाहेरगावी असल्याचं सांगण्यात येते तसेच कार्यालयामध्ये मुख्यालय सहाय्यक नेमणूक असून मुख्यालय सहाय्यक हे पुणे लातूर या ठिकाणी रहात असून तेथून ये जा करत असल्याने कार्यालयीन वेळेपेक्षा उशीर होत असल्याचं दिसून येते तसेच अन्य शासकीय कर्मचारी हे धाराशिव या ठिकाणावरून ये जा करत असल्याचं दिसून येते . शासन परिपत्रकानुसार शासकीय कर्मचारी मुख्यालयात राहणे बंधनकारक असताना पण जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांशी संगणमत करून शेतकऱ्याची तसेच नागरिकाची अडचण निर्माण करून अधिकारी वर्ग मुख्यालयात रहा नसून बाहेरगावी रहात आहेत .या अधिकाऱ्यांनी संबंधित 2020 ते आज पर्यंत पगार पत्रकानुसार त्यांनी उचललेल्या रहात असलेल्या जागेचे घर भाडे तत्काळ चौकशी करून वसूल करून संबंधित अधिकाऱ्यांनी वर शासनाची व नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी तत्काळीत गुन्हे दाखल करण्यात यावा .निवेदनानुसार तत्काळ चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांच्या वतीने दिनांक 16 डिसेंबर रोजी उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयासमोर मागण्या मान्य होईपर्यंत तीव्र आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनावर राहील असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे या निवेदनावर जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांची स्वाक्षरी आहे .प्रकरणांमध्ये जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय धाराशिव हे याप्रकरणी काय कारवाई करणार?शासनाच्या परिपत्रकानुसार मुख्यालयात राहणे बंधनकारक असताना पण अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सदर कर्मचारी तसेच मुख्यालय सहाय्य हे बाहेरगावी राहत आहेत अशा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पाठराखण करून अभय देणार का कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे .तर भ्रष्ट कारभाराचा पत्रकार परिषद घेऊन अधिकाऱ्यांच्या विरोधात पुरावे सादर करणार असल्याचं जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे .