मानलं भावा….! उच्च शिक्षण घेवून नोकरीं नाही मिळाली; म्हणुन पट्ट्याने सुरु केले दुध व्यवसाय आज महिण्याकाठी कमवतोय लाखोने..
आपली स्वप्न पूर्ण करायची असतील तर वेळ वाया घालवू नका – युवा उद्योजक दिपक काचोळे…
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील एका गरीब कुटुंबातील दीपक काचोळे यांनी दूध व्यवसायावर लाखो रुपायाचीकार घेण्याची कल्पना ही एखाद्या व्यक्तीच्या मेहनतीचे आणि चिकाटीचे फळ आहे. हे तुळजापूर येथील युवकाने दाखवून देत योग्य नियोजन आणि कठोर परिश्रमाने आर्थिक ध्येय गाठता येते असे तुळजापूरचे उद्योजक दिपक काचोळे यांनी या दुध व्यवसायातून दाखवून दिले. इतर व्यवसायिकांनी दीपक काचोळे यांचा आदर्श घ्यावा असे दूध व्यवसायातून तालुक्याला दाखवून दिले.
सध्याच्या घडीला अनेक जन उच्च शिक्षण घेवून सकारी नोकरीची वाट बघण्यापेक्षा नोकरीऐवजी शेतीआधारीत उद्योगांना प्राधान्य देताना दिसत आहेत. अनेक जण शेतीला जोडधंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुग्ध उत्पादनाला प्राधान्य देत आहे. दुग्ध व्यवसाय करताना जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर अनेकांना मोठे यश देखील मिळत आहे. आज तुळजापूर शहरातील दिपक काचोळे या गरीब कुटंबातील दुध उत्पादक शेतकऱ्याने दाखवूर दिले. ज्यांनी मोठ्या आर्थिक संघर्षातून डेअरी व्यवसायात स्वत:ची एक विशेष ओळख निर्माण केली आहे. आज ते आपल्या दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून लाखोरुपयाचा टर्नओव्हर करत आहेत.यांचा तुळजापूर शहरातून मित्र परिवारांच्या वतीने कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दुग्ध व्यवसाय हा तरुणांसाठी आर्थिक विकासाचा आणि स्वप्नपूर्तीचा एक उत्तम मार्ग आहे, जो ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देतो आणि सामाजिक परिवर्तनाला हातभार लावतो, असे अनेक दाखले उपलब्ध आहेत. तुळजापूर तालुक्यात अनेक तरुण यशस्वी झाले असून, त्यांनी स्व-उद्योजकतेतून आपले भविष्य घडवले आहे.
दुग्ध व्यवसाय हा तरुणांसाठी रोजगाराचा एक चांगला स्रोत आहे. या व्यवसायातून केवळ दूध उत्पादनच नव्हे, तर दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन, विक्री आणि वितरण यांसारख्या विविध उपक्रमांमध्ये तरुणांना संधी मिळते.
समाज सुधारक विशाल छत्रे, तुळजापूर.