नांदुरीत परिसरात पावसाचा तडाखा; पिकांचे अतोनात नुकसान,पण महसूल प्रशासनाच्या मदतीपासून वंचित शेतकरी!

नांदुरीत परिसरात पावसाचा तडाखा; पिकांचे अतोनात नुकसान,पण महसूल प्रशासनाच्या मदतीपासून वंचित शेतकरी!

तुळजापूर : प्रतिनिधी

तालुक्यातील नादुरी गावात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने शेतकऱ्यांच्या हातचे पीक पाण्यात गेले. असुन सोयाबीन, उडीद यासारखी हातातोडाशी आलेली पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. मात्र पर्जन्यमापक यंत्र इतर गावात असुन तिथे कमी पाऊस दाखवत आहे. खरी परिस्थिती वेगळी असूनही कागदोपत्री पावसाची नोंद कमी असल्याने शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मंगरूळ मंडळातील कसई, नांदुरी, यमगरवाडी शिवारातील नुकसानीचे पंचनामे सरपंच हणमंत पाटील, उपसरपंच नवनाथ मारकड, कृषी सहाय्यक आगळे, तलाठी कुलकर्णी व शेतकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

आकाशातून तडाखा आणि जमिनीवर अन्याय!शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले मात्र यंत्रावर कमी पाऊस नोंदला गेला असुन मदत मिळण्यास अडथळा निर्माण होत असल्याने ग्रामस्थांनी याची प्रशासनाकडे तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे.यामुळे
नुकसान पावसाने केले, पण भरपाईतून वंचित ठेवणारे यंत्र आहे म्हणजे म्हसूल प्रशासन आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!