मंदिराच्या जीर्णोद्धाराबाबतचा आ.राणा पाटीलांचा अर्धवट व्हिडिओ दाखवून जनतेची दिशाभूल करणे बंद करा
खासदारांना टोला मारत म्हणाले जनता आता कंटाळली आहे बस करा – आनंद कंदले
धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी
श्री क्षेत्र तुळजापूर विकास
प्राधिकरणाच्या कामकाजावरून स्थानिक राजकारण पुन्हा एकदा तापले आहे.कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाबद्दल जाणीवपूर्वक अपप्रचार करून तुळजापूर आणि मंदिराच्या बदनामीचे षडयंत्र रचले जात आहे. महायुती सरकारने तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी तब्बल १८६५ कोटी रुपयांचा अभूतपूर्व निधी मंजूर केला असताना, या ऐतिहासिक कामात ज्यांचे योगदान शून्य आहे, असे महविकास आघाडीचे शिवसेनेचे खासदार,आमदार जाणीवपूर्वक अर्धवट खोटी माहिती पसरवत आहेत. ज्यामुळे भाविकांच्या मनात नाहक संभ्रम आणि अस्वस्थता निर्माण होत आहे.खासदारांनी विकास कामासंदर्भात कधी पत्रकार परिषद घेतली आहे का ? कधी निधी आणला आहे का ? वारंवार टीकात्मक भूमिका घेऊन नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करतात शिवसेनेचे आमदार खासदारांनी धाराशिव येथे दि.१७ रोजी दुपारी दोन वाजता पत्रकार परिषद घेऊन तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराबाबतचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी बोलतानाचा अर्धवट व्हिडिओ दाखवून जनतेची दिशाभूल केली आहे. तुळजापूर भाजपा तालुकाध्यक्ष आनंद कंदले यांनी प्रतिष्ठा भवन धाराशिव येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आ. राणा पाटलांचा मंदिराच्या जीर्णोद्धाराबाबतचा पूर्ण व्हिडिओ दाखवून संभ्रम दूर केला.तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी तब्बल १८६५ कोटी रुपयांचा अभूतपूर्व निधी मंजूर झाल्यामुळे विरोधकांच्या पोटात आग
डोंबा उठला आहे.भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी शिवसेना उबाटा गटाचे खासदार ओमप्रकाराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना टोला मारला यावेळी पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी,माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे,तुळजापूर भाजपा तालुका अध्यक्ष आनंद कंदले,शहराध्यक्ष शांताराम पेंदे,अमित शिंदे आदी उपस्थित होते.